कोरोनासाठी निधीची कमतरता भासणार नाही : अजित पवार


वेब टीम : पुणे
कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे

अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आज लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केल्या.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही तथापि खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, गिरीश बापट यांनी केंद्राकडून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

बैठकीला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खाजगी हॉस्पिटलचे ८० टक्के बेड ताब्यात घेण्यात येणार आहेत.

आपल्या सूचनांची प्रशासन निश्चित दखल घेईल. वेळोवेळी बैठका घेतल्या जातील. आपल्या सूचना वेळोवेळी पाठवा असेही सांगितले.

सोशल मिडिया अधिक सक्रिय केला पाहिजे. कोरोनाच्याबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना व प्रशासनाच्यावतीने सामान्य नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या सूचनांची रोजच्या रोज माहिती दिली जावी.

जेणेकरुन लोकप्रतिनिधींना माहिती मिळेल असे खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post