वेब टीम : अहमदनगर शिवसेना उपनेते व माजी आमदार अनिल राठोड यांनी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्याबद्दल अपशब्द वापरुन अपमान केल्याची ऑडीओ क...
वेब टीम : अहमदनगर
शिवसेना उपनेते व माजी आमदार अनिल राठोड यांनी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्याबद्दल अपशब्द वापरुन अपमान केल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.
त्यातून अनिल राठोड यांच्या डोक्यातील जातीय मानसिकता बाहेर पडली आहे.
अत्यंत गलिच्छ भाषा वापरल्याने, जातीय मानसिकतेतून अनिल राठोड यांनी असे वक्तव्य केले असावे, त्यामुळे पोलिस प्रशासनाने जलद गतीने तपास करुन अनिल राठोड यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली आहे.
प्रभाग क्र. १५ शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड हे दलित चळवळीतील कार्यकर्ते असल्याने त्यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दा बाबत तपास करुन अनिल राठोड यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी,
अशी मागणी शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे करण्यात आली.यावेळी सुरेश बनसोडे, ‘लोकशाही विचारंमथ’चे सोमा शिंदे, अजय साळवे, सुशांत म्हस्के, अशोक गायकवाड, किरण दाभाडे, सुमेध गायकवाड, पवन भिंगारदिवे, समीर भिंगारदिवे, सिद्धार्थ आढावा, बाली बांगरे, पप्पू पाटील, बंटी भिंगारदिवे, सागर भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
COMMENTS