अनुष्का शर्माच्या अडचणीत वाढ; पोलिसांमध्ये तक्रार दाखल


वेब टीम : दिल्ली
अभिनेत्री आणि पाताल लोक वेबसिरीजची निर्माती अनुष्का शर्माच्या अडचणीत वाढ झाली आहे.

उत्तरप्रदेशातील आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी ‘पाताल लोक’ वेब सीरीज मध्ये त्यांचे आणि अन्य भाजप नेत्यांचे फोटो गुन्हेगारीच्या प्रतिमा असणाऱ्या नेत्यांशी जोडत वापरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

सीरीजच्या माध्यमातून सनातन धर्मातील जाती व भारतीय संस्थांचे चुकीच्या चित्रिकरणाला देशद्रोह सांगत आमदाराने लोणी कोतवाली येथे निर्माती अनुष्का शर्मावर रासुकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नंदकिशोर गुर्जर यांनी वेब सीरिजमध्ये वापरलेले फोटो, सनातन धर्माची चुकीची प्रतिमा दाखवणे आणि भारतीय संस्थांचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला आहे.

वेब सीरीजची निर्माती अनुष्का शर्माने वेब सीरीजमध्ये बालकृष्ण वाजपेयी नावाच्या गुन्हेगारीशी संबंधित नेत्यासोबत पुलाचे उद्घाटन करताना माझा आणि अन्य भाजपच्या नेत्यांचा फोटो दाखवला आहे.

मी सध्या भाजपचा आमदार असून परवानगी शिवाय माझ्या फोटोचा वापर करण्यात आला.याशिवाय वेब सीरीज मध्ये गुर्जर जाती डाकू आणि चुकीच्या कामात सहभागी असल्याचे दाखवले आहे.

पंजाबचे जाट (जट), ब्राह्मण, त्यागी इत्यादी जातींमध्ये भेदभाव आणि जातीवाचक शब्दांचा वापर करत त्यांचे जीवन खालच्या पातळीवर असल्याचे दाखवले आहे.

जो धर्म मुंग्यांना पीठ टाकतो आणि विश्व कल्याणासाठी प्रार्थना करतो त्या धर्माची प्रतिमा विनाकारण मॉबलिचिंगच्या घटनेला १९९० रामजन्मभूमीच्या कारसेवकांसोबत जोडून प्रदर्शित करण्यात आली.

या सीरीजमध्ये भाजपची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post