ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो : राज्यपाल कोश्यारी


वेब टीम : मुंबई
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील  नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

राज्यातील सर्व नागारिकांना, विशेषतः मुस्लिम बंधू-भगिनींना ईद-उल-फित्रनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.

रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना व परोपकाराला महत्त्व दिले आहे.

यंदा कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत परोपकाराचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

यावर्षी ईद घरी राहून तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरी करावी असे आवाहन करतो.

ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post