भाजपच्या नेत्यांना आता रचनात्मक टीकाही सहन हात नाही, त्यामुळेच ते रडीचा डाव खेळताहेत...

file photo

वेब टीम : सोलापूर

राष्ट्रवादी पक्षावर आणि नेतृत्वावर मागील पाच वर्षांच्या काळात अश्लील शब्दात टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आता जनतेच्या रचनात्मक टीकासुद्धा सहन होत नाहीत.

त्यामुळे ते टीका थांबविण्यासाठी तक्रारी करुन रडीचा डाव खेळत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सोलापुरामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

विरोधकांचा समाचार घेताना पाटील म्हणाले की, भाजप नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत.

ही मागणी करण्यापूर्वी त्यांनी ‘आघाडी बिघाडी’, ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी.

आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजप नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्यावरील टिका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजप नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहे, हेच स्पष्ट होते.

सोशल मिडीयातील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का?

गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, अत्यंत अश्लील टीका एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर होत होती, त्यावेळी आमच्या तक्रारीसुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते.

आज जनता भाजप नेत्यांवर रचनात्मक टीका करत आहे, तर ती भाजप नेत्यांना सहन होत नाही.

भाजपने रडीचा डाव खेळू नये. पाच वर्षांच्या काळात सोशल मीडियावर दोन ओळी लिहिल्या तर त्या तरुणांना बेदम मारहाण करून हजारो जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

आणि याच तरुणांनी आपल्यावरील अन्यायाचा राग निवडणुकीत काढून भाजपला त्यांची जागा दाखविली असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post