कोरोना : राज्यात एकाच दिवसात १२०० रुग्णांना दिला डिस्चार्ज


वेब टीम : मुंबई
राज्यात आज कोरोनाचे १२०२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या असून राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे २५ टक्के आहे.

कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर नेण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नॉन रेड झोन मध्ये बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आली

खासगी डॉक्टर्स आणि शासन यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post