कोरोनाची दुसरी लाट असणार अत्यंत भयावह... आरोग्य संघटनेचा इशारा


वेब टीम : दिल्ली
‘कोरोना’ संसर्गाची प्रकरणे कमी होत असलेल्या देशांना जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे.

‘कोरोना’ची प्रकरणे कमी होत असलेल्या देशांत अचानक ती वाढू शकतात.

यामुळे फक्त पाहत न बसता सरकारांनी महामारी रोखण्याच्या उपाययोजनांसोबत तयार राहावे.

जागतिक आरोग्य संघटनेचे आणबाणी प्रमुख डॉ. माइक रेयान म्हटले की, संपूर्ण जग ‘कोरोना’ संसर्गाच्या पहिल्या लाटेशी झुंज देत आहे.

अनेक देशांत रुग्णसंख्येत घट होत आहे. मध्य आणि दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिकेत रुग्णसंख्या वाढत आहे.

साथीचे रोग लाटेच्या स्वरुपात येतात. यामुळे ज्या भागांत प्रकरणे कमी झाली, त्या क्षेत्रात ही लाट पुन्हा येऊ शकते.

सध्या सुरू असलेल्या संसर्गाची पहिली फेरी थांबविली गेली तरी पुढच्या वेळी संसर्गाचे प्रमाण खूप वेगवान असू शकते, असे डॉ. माइक रेयान यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post