शेतीवर कीटकांचा हल्ला; देशावर टोळधाडीचे संकट


वेब टीम : दिल्ली
देशात कोरोनासोबतच शेतातील पिकांवरील टोळधाडीचे संकटही गडद होत चालले आहे.

शेतातील उभे पीक फस्त करणारे ही कीटक सोमवारी राजस्थानच्या जयपूरमधील रहिवासी परिसरातही दिसले.

मनपा कर्मचाऱ्यांनी कीटकनाशक फवारल्यानंतर हे दौसाच्या दिशेने रवाना झाले.

राजस्थान, पंजाब आणि मध्यप्रदेशात या टोळधाडीने उच्छाद मांडला आहे.

शेतात पीक नसेल तर हे टोळ रहिवासी भागातील झाडांचे नुकसान करत आहेत.

टोळधाडीची ही लाट एकामागे एक राज्यांमध्ये पसरत असून उत्तरप्रदेशातही त्यांनी धडक मारली आहे.

यूपीतील अनेक राज्यांमध्ये टोळधाडीचा शिरकाव झाल्याने राज्य सरकारने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

एप्रिलच्या दुसऱ्या महिन्यात टोळधाड पाकिस्तानातून राजस्थानात दाखल झाली होती.

काही तासांत हजारो एकर पीक ही टोळधाड खाऊन फस्त करते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post