वेब टीम : दिल्ली भारतीयांना सोन्याच्या दागिन्यांचे आणि सोन्यातील गुंतवणुकीचे आकर्षण सर्वश्रुत आहे. भारतीयांचा सोने खरेदीकडे असलेला कल...
वेब टीम : दिल्ली
भारतीयांना सोन्याच्या दागिन्यांचे आणि सोन्यातील गुंतवणुकीचे आकर्षण सर्वश्रुत आहे.
भारतीयांचा सोने खरेदीकडे असलेला कल काही महिन्यांपर्यंत कायम होता.
आता मात्र या महागड्या खरेदीलाही कोरोनाचा फटका बसल्याचे सध्या आकडेवारीवरुन दिसते.
यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये भारतामध्ये होणाऱ्या सोन्याच्या आयातीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली.
मागील वर्षी एप्रिलच्या तुलनेत या वर्षीची आयात ही ९९.९ टक्क्यांनी घसरली.
एप्रिल महिन्यात देशामध्ये केवळ ५० किलो सोने आयात झाले.
सरकारी सुत्रांनी दिलेल्य माहितीनुसार विमानसेवा बंद असल्याने आणि लॉकडाउनमुळे देशभरातील ज्वेलर्सची दुकाने बंद असल्याने ही ऐतिहासिक घसरण पहायला मिळत आहे.
भारतीय लोक आजही सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. मात्र मागील महिन्याभरामध्ये सोनं खरेदीकडे भारतीयांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसते.
भारतात एप्रिलमध्ये केवळ ५० किलो सोनं आयात झाले.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात भारतामध्ये ११०.१८ टन सोनं आयात झाल्याचे रॉयर्टर्स या वृत्तसंस्थेने म्हटले.
मागील तीन दशकांमधील सोने आयातीचा हा निच्चांक आहे.
किंमतीच्या आधारावर सांगायचे झाल्यास एप्रिल महिन्यात भारतामध्ये २.४८ मिलियन डॉलर सोन्याची आयात झाली असल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
मागील वर्षी आयात केलेल्या सोन्याची किंमत ३.९७ अरब डॉलर इतकी होती.
सध्या देशामध्ये २२ कॅरेट सोन्याचा प्रती ग्रॅम भाग ४४ हजार ५६० रुपये इतका आहे.
२५ मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे देशभरामध्ये सर्व सेवा बंद केल्या.
यामध्ये मॉल, चित्रपटगृहे, लग्नाचे हॉल यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली.
अनेकांनी आपले समारंभ पुढे ढकलली. त्यामुळेच सोन्याची मागणी घटली.
COMMENTS