देशात २४ तासांत वाढले ३ हजार ३९० नवे रुग्ण


वेब टीम : दिल्ली
देशातील कोरोना रुग्णांची संख्या ५६ हजार ३४२ वर पोहोचली आहे. मागच्या २४ तासांत ३३९० नवे रुग्ण आढळले.

तर, १०३ जणांचा मृत्यू झाला. यामुळे देशातील मृतांचा आकडा १८८६ वर पोहचला आहे.

सध्या ३७ हजार ९१६ जणांवर उपचार सुरु आहेत. तर १६ हजार ५४० लोक कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता २९.३६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

याचाच अर्थ तीन पैकी १ रुग्ण बरा होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

मागच्या २४ तासांत १२७२ रुग्ण बरे झाले असेही ते म्हणाले. सध्या ३.२ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

तर ४.७ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. तर, १.१ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

मागच्या २८ दिवसांत ४२ जिल्ह्यांत एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही.

तर २९ जिल्ह्यात मागच्या २१ दिवसांत एकही रुग्ण आढळला नाही.

मागच्या १४ दिवसांत ३६ जिल्ह्यात तर ७ जिल्ह्यात ४६ जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही,असेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

देशात कोरोनाचा मुक्काम लांबणार अशी चिन्हे असून आपण कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे, असेही लव अग्रवाल यांनी सांगितले.

मुंबईतील वाढती कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या पाहता केंद्राचे पथक दर आठवड्याला मुंबईत येणार आहे.

या पथकासोबत काल लव अग्रवाल आले होते. यावेळी ते बोलत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post