मुंबईसाठी वेगळ्या आर्थिक पॅकेजची गरज : संजय राऊत


वेब टीम : मुंबई
लाखो कामगार मुंबईतून निघाले आहेत.

मुंबईत त्यांचं पोट भरत नसल्याने ते आपापल्या राज्यात निघून गेले आहेत


असं सांगताना मुंबईसारख्या शहरांचं महत्त्व टिकवणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

देशाच्या आर्थिक राजधानीचं महत्त्व टिकवणं पाहिलं काम आहे.

मुंबईचं आर्थिक महत्त्व देशात आणि जगात टिकणं महत्त्वाचं आहे.

त्यामुळे पंतप्रधानांनी वेगळं आर्थिक पॅकेज दिलं पाहिजे.

मुंबईतून २० ते २५ क्के महसूल देशाच्या तिजोरीत जमा केला जातो.

त्यामुळे फक्त मुंबईच नाही तर मुंबईसारख्या शहरांसाठी आर्थिक पॅकेज देणं गरजेचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे.

यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मोदींच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना शिवसेनेने याच स्वागत केलं आहे.

मोदींच्या या निर्णयाचं शिवसेना स्वागत करून खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच देशाला इतक्या मोठ्या पॅकेजची गरज होती.

मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज जाहीर केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

नरेंद्र मोदींनी पॅकेजच्या माध्यमातून देशातील शेतकरी, मजूर, लघू-मध्यम उद्योगांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

करोनाचं मोठं संकट असल्याने सध्या टीका करणं योग्य होणार नाही.

संपूर्ण देशाने पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे.

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याबाबत सर्व मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढवला जावी अशी भूमिका मांडली होती. असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post