रिकाम्या पोटी लसूण खाण्याने शरीराच्या अनेक समस्या होतील छूमंतर...


वेब टीम : मुंबई
रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत.

लसूण जेवणाची चव वाढवते पण त्याचबरोबर लसणीत अनेक औषधी गुणधर्मदेखील आहेत.

लसूण रिकाम्यापोटी खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाबापासून सुटका मिळते. 

त्यामुळे उच्च  रक्तादाब असलेल्यांना लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.

पोटाच्या अनेक तक्रारी लसणीचे सेवन केल्यानं कमी होतात. 

उकळलेल्या पाण्यात लसणीच्या पाकळ्या टाकून ते पाणी प्यावे यामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. 

लसणीमुळे हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो.

रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्यानं पचनशक्ती  सुधारते. यामुळे भूक चांगली लागते. 

लसणीमुळे सर्दी- खोकला, अस्थमा यांसारखे त्रास कमी  होतात. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post