वेब टीम : टोकिओ जोपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे, तोपर्यंत २०२१ मध्ये देखील ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करणे शक्य नाही, तर आम्हाल...
वेब टीम : टोकिओ
जोपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे, तोपर्यंत २०२१ मध्ये देखील ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करणे शक्य नाही, तर आम्हाला वेळ हवा आहे.
त्यानंतरच चांगले आयोजन करता येइल अशी विनंती जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आॉलिम्पिक समितीपुढे केली.
तर यावर मत मांडताना ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच म्हणाले की टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा जर २०२१ मध्ये आयोजित करणे शक्य झाले नाही,
तर ती स्पर्धा रद्द करण्यात येईल. २४ जुलै २०२० पासून रंगणारी प्रतिष्ठेची टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धादेखील २०२० ऐवजी २०२१ या वर्षात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून देण्यात आली होती.
ही समस्या समजून घेत बॅश यांनी वरील विधान केले. जपानची समस्या आपण समजून घ्यायला हवी.
कारण करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपेपर्यंत जपान काहीही करू शकत नाही.
त्यात महत्त्वाचं म्हणजे ऑलिम्पिक आयोजनासाठी कामावर रूजू करून घेतलेल्या सुमारे तीन ते पाच हजार अतिरिक्त कर्मचार्यांना किती काळ अशाच प्रकारे मानधन किंवा वेतन देणे शक्य होणार आहे.
जगभरातील सर्व देशांचे वार्षिक वेळापत्रक दरवर्षी बदलणे ही सोपी बाब नाही. जेव्हा २०२१ मध्ये जगाबाबत नीट कल्पना येईल,
तेव्हाच त्यावर निर्णय घेतला जाईल अन्यथा ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करावी लागेल, असे बॅच म्हणाले.
दरम्यान, यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद जपानकडे आहे.
COMMENTS