चीनचा हल्ला म्हणजे पूर्वनियोजित कट... गंभीर परिणाम होतील... भारताचा इशारा

file photo

वेब टीम : दिल्ली

भारतीय सैनिकांवरील हल्ला ही चीनची पूर्वनियोजित चाल होती, या शब्दांत भारताने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गलवान खोर्‍यातील हिंसक झटापटीनंतर परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात काल प्रथमच दूरध्वनीवरून चर्चा झाली.

यावेळी जयशंकर यांनी, गलवान खोर्‍यात जे घडले तो एक पूर्वनियोजित आणि योजनाबद्ध कट होता, ज्याचे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.

चीनच्या बाजूने जे काही करण्यात आले ते दोन्ही देशांमध्ये जे ठरले त्याचे सरळसरळ उल्लंघन आहे.

गलवान खोर्‍यातील घटनेचे द्विपक्षीय संबंधावर परिणाम होऊ शकतात, असेही जयशंकर म्हणाले.

चीनने असे पूर्वनियोजित कृत्य करण्याऐवजी शांततेच्या मार्गाने तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते, असेही जयशंकर म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post