अहमदनगर : धक्कादायक... शहरात १८ तर जिल्ह्यात नव्याने सहा कोरोनाबाधित रुग्णांची भर...


वेब टीम : अहमदनगर
अहमदनगर शहरात आज बुधवारी (दि.२४) एकाच दिवसात शहरात तब्बल  १८ ‘कोरोना’ पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

तर जिल्हयात जिल्ह्यातील अन्य ठिकाणचे ६ असे जिल्हयात एकाच दिवसात २४ कोरोना बाधित आढळून आले आहेत.

आजपर्यंत एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये तोफखाना येथील ७, नालेगाव वाघ गल्ली १, सिद्धार्थनगर येथील ४,  दिल्लीगेट २ आणि बालिकाश्रम रोडवरील १, रासनेनगरला २ तर लेंडकर मळ्यातील १यांचा समावेश आहे.

याशिवाय संगमनेर ४, जामखेड येथील १ व श्रीरामपूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६२ झाली असून एकूण रुग्ण संख्या ३२८ इतकी झाली आहे तर २५४ जण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

आज कोरोना बाधित आढळलेल्या मध्ये नगर शहरातील तोफखाना येथील ८० वर्षीय आणि ५९ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय पुरुष २ वर्षाचा मुलगा, २२ वर्षीय तरुणाचा तसेच ४६ वर्षीय व ९० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

नालेगाव येथील २२ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच सिद्धार्थनगर येथे ८ वर्षीय मुलगी, ३० वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष व २५ वर्षीय युवक कोरोना बाधित आढळला आहे.

दिल्लीगेट येथील १३ वर्षीय मुलगा, ३३ वर्षीय महिला, बालिकाश्रम रोडवरील ४५ वर्षीय महिला, रासने नगर येथील १५ वर्षाचा मुलगा व ४८ वर्षाच्या महिला, लेंडकर मळ्यातील ४५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. हे सर्वजण यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

या शिवाय  संगमनेर येथील ४ पुरुष, जामखेड तालुक्यातील जवळे येथील ३० वर्षीय व्यक्ती व श्रीरामपूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post