वेब टीम : अहमदनगर आज जिल्ह्यात ५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ४८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव आले आहेत. अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील...
वेब टीम : अहमदनगर
आज जिल्ह्यात ५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
तर ४८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव आले आहेत.
अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील ब्राह्मणगल्लीतील तिघे बाधित झाले.
येथे यापूर्वी बाधित आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील ६५ आणि ४१ वर्ष वयाच्या दोघी महिला बाधित झाल्या.
तसेच याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित झाला आहे.
संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील २६ वर्षीय महिला बाधित झाली.
भांडूप येथून श्रीरामपूर येथे आलेला ५५ वर्षीय व्यक्तीही बाधित आढळून आला आहे.
COMMENTS