कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार बरसणार... मॉन्सूनही लवकरच महाराष्ट्रात...


वेब टीम : मुंबई
खासगी हवामान संस्थेने ३० मे रोजी मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा दावा केला होता. 

तर सोमवारी मान्सून केरळात दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. 

त्या अनुषंगाने केरळच्या ९ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

यामध्ये अलपुझा, कोल्लम, पथनमथिट्टा, तिरुवनंतपुरम, कोट्टयम, एर्नाकुलम, इडुक्की, मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यांचा समावेश आहे. 

समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याने कोकणासह राज्याच्या बहुतांश भागाला पुढील चार दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने याआधी १ जूनला संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली होती. 

तसेच २ जूनला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे.

३ आणि ४ जूनला उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

या कालावधीत कोकणात इतर ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. 

विदर्भामध्येही विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post