अहमदनगर : जिल्हाबंदीचे उल्लंघन, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल....


वेब टीम : अहमदनगर
कोरोना संचारबंदी काळात विनापरवाना मुख्यालय सोडून स्वत:च्या खाजगी कामाकरिता जिल्हा बंदीचे उल्लंघन करून पुण्याची सफर वेळोवेळी केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांच्याविरुद्ध बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रीडाधिकारी कविता नावंदे ह्या गुरुवारी (दि.18) सकाळी आठ वाजता कारमधून पुण्याहून नगरकडे येत होत्या.

पुणे-नगर महामार्गावर गव्हाणेवाडी चेक पोस्टवर त्यांची गाडी श्रीगोंद्याच्या नायब तहसीलदार योगिता ढोले व अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांनी अडविली आणि परवान्याची चौकशी केली.

मात्र, त्यांच्याकडे परवाना नसल्याने त्यांना ताब्यात घेतले.

कविता नावंदे या पुण्याला राहत असून त्यांनी संचारबंदी काळात पुणे-नगर असा असा प्रवास केला असल्याची महिती समजली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post