गलवान खोऱ्यात हल्ला झालेल्या ठिकाणी चीनने उभारले बंकर....


वेब टीम : बीजिंग
लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी चिनी सैन्यासोबत झालेल्या हिंसाचारात २० भारतीय जवान हुतात्मा झाले होते.

त्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला.

तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याबाबत सहमती दर्शवली.

मात्र, गलवान खोऱ्यात चीनने बंकर तयार केल्याचा दावा होत आहे. या दाव्यानंतर आता पुन्हा खळबळ उडाली.

ओपन सोर्स इंटेलिजेंस ऍनालिस्ट Detresfaने गलवान खोऱ्यातील सॅटेलाइट इमेज प्रकाशित केल्या.

या छायाचित्राच्या आधारे चीन गलवान खोऱ्यात बंकर बनवत असल्याचा दावा होत आहे.

या ठिकाणी भारतीय जवान आणि चिनी सैन्यात संघर्ष झाला होता. या ठिकाणी चीनने छोट्या भिंती उभारल्या आहेत.

या नवीन छायाचित्रामधून चीनच्या मनसुब्यांवरच प्रश्न उपस्थित होत आहे.

एका बाजूला चीन भारतासोबत चर्चा करत असून दुसऱ्या बाजूला आपली लष्करी ताकद या ठिकाणी वाढवत आहे.

चीनची पीपल्स लीबरेशन आर्मीने पँगोंग त्सो तलाव परिसरात अजून ठाण मांडले आहे. इतकेच नव्हे तर हळूहळू चीनची सैन्य लहान गटांद्वारे वाढत आहे.

पँगोंग त्सो तलावापासून दक्षिणेकडील भागात १९ किमी अंतरावर चीनची सैन्याची जमवाजमव दिसली आहे.

पँगोंग त्सो तलावाजवळ भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर येण्याची दाट शक्यता आहे.

या ठिकाणी दोन्ही देशात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post