वेब टीम : दिल्ली ट्विटरचे नवीन फिचर ‘फ्लीट्स’ लवकरच भारतात सुरू होणार आहे. ब्राझिल आणि इटलीनंतर भारत हा तिसरा देश असेल, जिथे ट्विटरचे...
वेब टीम : दिल्ली
ट्विटरचे नवीन फिचर ‘फ्लीट्स’ लवकरच भारतात सुरू होणार आहे.
ब्राझिल आणि इटलीनंतर भारत हा तिसरा देश असेल, जिथे ट्विटरचे हे नवीन फिचर युजर्सना वापरता येणार आहे.
या फिचरमध्ये २४ तासांनंतर पोस्ट दिसेनाशी होते. कोणतेही लाइक्स, रिट्विट्स किंवा पब्लिक प्रतिक्रिया दिसत नाहीत.
केलेले ट्विट्स हे सार्वजनिक असण्यासोबत कायमस्वरूपी राहतात आणि रिट्विट्स व लाइक्स दिसत राहतात.
त्यामुळे फ्लीट्स या फिचरअंतर्गत अधिकाधिक लोकांना ट्विटर मुक्तपणे अभिव्यक्त होण्यास वापरता येईल,असा यामागचा उद्देश्य आहे.
ट्विटर ग्रुप प्रॉडक्ट मॅनेजर मो अलाधम या फिचरविषयी म्हणाले,”ट्विटर हे लोकांना चालू घडामोडींबाबत माहिती देणारे आणि त्याबाबत चर्चा करण्यासाठी सुविधा देणारे साधन आहे.
ब्राझिलमध्ये फ्लीट्सची चाचणी सुरू केल्यापासून ट्विटरवर नेटकरी त्यांच्या मनातील विचार निःसंकोचपणे शेअर करताना दिसत आहेत.
सतत ट्विट न करणारे लोक फ्लीट्सच्या माध्यमातून अधिक संवाद साधू लागले आहेत.
नवीन फ्लीट तयार करण्यासाठी तुमच्या प्रोफाइलच्या वरील डाव्या बाजूस असलेल्या आयकॉनवर क्लिक करा.
फोटो किंवा व्हिडिओ करण्यासाठी टायपिंग सुरू करा किंवा मीडिया आयकॉनवर क्लिक करा.
पोस्ट करण्यासाठी ‘फ्लीट’वर क्लिक करा.
व्यक्तींचे नवीन फ्लीट्स पाहण्यासाठी आयकॉनवर क्लिक करा.
नवीन फ्लीट्स, तसेच जुने फ्लीट्स पाहण्यासाठी खाली स्वाइप करा.
तुम्ही फॉलो करत असलेल्या इतर अकाऊंट्समधील फ्लीट्स पाहण्यासाठी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा. अशा प्रकारे तुम्हाला ट्विट पाहता येईल.
फ्लीट्सवरील तुमच्या फॉलोअर्सना प्रतिक्रिया देण्यासाठी डायरेक्ट मॅसेजेस् (डीएम) सुरू केल्यानंतर प्रतिक्रिया व प्रतिसाद देण्यासाठी कळ उपलब्ध आहेत.
फॉलोअर्स डीएमच्या माध्यमातून खासगीरित्या प्रतिक्रिया देऊ शकतात किंवा इमोजीसह जलदपणे प्रतिसाद देऊ शकतात
आणि डीएममध्ये खासगीरित्या संवाद सुरू ठेवू शकतात.
COMMENTS