वेब टीम : दिल्ली भारतीयांच्या चर्चेतून हद्दपार झालेल्या सेक्सवर आता तरुणाईच नव्हे तर वय झालेलेली चर्चा करताना दिसतात. जागतिकीकरणाच्या काळात ...
वेब टीम : दिल्ली
भारतीयांच्या चर्चेतून हद्दपार झालेल्या सेक्सवर आता तरुणाईच नव्हे तर वय झालेलेली चर्चा करताना दिसतात. जागतिकीकरणाच्या काळात हा बदल झालेला आहे.
मात्र, तरीही सेक्सवरील चर्चा आरोग्याच्या अंगाने किंवा गरजेच्या अंगाने न होता वासनांध अंगाने किंवा अश्लील बाजूनेच केली जाते. मात्र, भारतीय आयुर्वेदातही या महत्वाच्या शारीरिक गरजेवर लेखन झालेले आहे.
होय, यावर जगजाहीर बोलणे टाळून सोज्वळ असल्याचा आव आणणारेही शास्त्रोक्त माहितीला मुकलेले आहेत. आयुर्वेदात जसे प्रणय हा महत्वाचा घटक मनाला आहे. तसाच भारतीय औषध कंपन्याही यामध्ये काम करीत आहेत.
त्यामुळेच योगशक्तीचा प्रसार करणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीकडूनही कामसुधा योग Swadeshi KaamSudha Yog हे औषध बनवून विकले जाते. तर, मुद्दा असा आहे की, आयुर्वेदात सेक्स करण्याबाबत काय सूचना आहेत तो..
तर, मित्र-मैत्रिणींनो, खजुराहो लेण्या कोरलेल्या सौंदर्यपूर्ण असा आपल्या भागात आयुर्वेद सांगते की, सेक्स हा रात्रीच्या वेळेमध्येच करावा. कारण त्यावेळी आपले चित्त शांत असते आणि मानसिकदृष्ट्या शरीर त्यासाठी तयार असते.
तसेच सर्व ऋतूमध्ये सेक्स केला जात असला तरीही हिवाळा आणि वसंत ऋतुची सुरुवात हा कालावधी उत्तेजानेसाठी चांगला असतो. त्यावेळी आठवड्यात ३-४ वेळा काहीजण सेक्स करू शकतात.
तर उन्हाळा आणि पावसाळा या कालावधीत वातावरणातील उष्णता आणि एकूण परिस्थिती लक्षात घेऊन आठवड्यातून १-२ वेळा सेक्स करण्यास हरकत नाही. याबाबतच्या नोंदी आयुर्वेदात आहेत.
COMMENTS