भारतात बनवले स्वस्तातले टेस्टिंग किट.. घरीच होणार निदान..


वेब टीम : दिल्ली
जर आपल्याला कोरोनाची स्क्रिनिंग करण्याची इच्छा आहे; पण त्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नसाल तर आता त्यासाठी एक उपकरण उपलब्ध होत आहे. 

नॅशनल अ‍ॅग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (नाबी) ने एक असे स्वस्त टेस्टिंग किट तयार केले आहे ज्याच्या सहाय्याने आपण किती ‘धोक्याच्या’ स्थितीत आहोत हे समजू शकते. 

तसेच ही माहिती ज्या परिसरात आपण राहता तेथील आरोग्य विभागाकडे पोहोचवली जाऊ शकते. अशा प्रकारच्या धोकादायक ठिकाणी पुन्हा एकदा आरटीपीसीआरच्या माध्यमातून आपली टेस्ट होऊ शकते.

‘नाबी’चे डॉ. महेंद्र बिश्नोई, डॉ. कांती किरण कोंडपुडी आणि त्यांच्या सहकार्यांनी हे किट विकसित केले आहे. जुलैच्या अखेरपर्यंत हे किट लोकांसाठी उपलब्ध होऊ शकते. 

त्याची किंमत सुमारे 50 रुपये असेल. ज्या लोकांना ताप, सर्दीखोकला किंवा अन्य कोरोनाची लक्षणे नाहीत अशा लोकांचीही तपासणी सोपी होऊ शकेल. कोरोनाचे संक्रमण झाल्यावर गंध व चव कळत नाही. 

त्यामुळे संशोधकांनी गंध घेण्याच्या क्षमतेवर काम सुरू केले होते. ऑनलाईन सर्व्हेच्या माध्यमातून सुरुवातीला शंभरपैकी पाच प्रकारचे गंध निवडण्यात आले जे आपले स्वयंपाकघर किंवा इतरत्र अनुभवण्यास मिळतात. 250 लोकांना सर्व्हे फॉर्म पाठवण्यात आले होते. 

त्यापैकी शंभरजणांनी प्रतिसाद दिला. किट तयार झाले व त्यामध्ये पाच प्रकारच्या गंधांबरोबरच एक प्रश्नावली होती. ही प्रश्नावली आणि किटमधील व्यवस्था अशी आहे की रुग्ण खोटे बोलू शकणार नाही किंवा माहिती लपवू शकणार नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post