राजू शेट्टी बारामतीत आंदोलन करतात हाच आमच्या सरकारमधील आणि आधीच्या सरकार मधील फरक...

file photo


वेब टीम : पुणे
राज्यात काय सुरू करायचे काय नाही याबाबत राज्य सरकार कोरोनाचा संसर्ग, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या याचा विचार करून घेत आहे.

त्यामुळे जिम, रेस्टोरंट्स, मंदिरे खुली करण्याबाबत एकूण परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागेल, असे खासदार सुप्रिया सुळे स्पष्ट केले.

मंदिरे, रेस्टॉरंट खुली करण्याच्या मागणीबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी वरील स्पष्टीकरण दिले. 

त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली. पुणे महापालिकेत बारामती लोकसभा मतदार संघाच्या कामांसंदर्भात अधिकार्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

केंद्र सरकारने प्रवासासाठी लागणारा ई- पास रद्द करण्याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या असताना यावर राज्य सरकारची भूमिका अशी विरोधी का आहे. 

तसेच राज्यातील चित्रपटगृहे,मंदिरे,जिम तसेच हॉटेल्स कधी सुरु होणार आहे ? 

या प्रश्नांवर सुळे म्हणाल्या, पुण्यात कोरोनाची परिस्थिती स्थिर असली तरी परिस्थिती धोक्याबाहेर आहे असे म्हणता येणार नाही. 

कोणीही धोका पत्करू नये. याबाबत तज्ज्ञांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. 


राज्यातील इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. येत्या आठ दहा दिवसांत राज्यातील चित्र आणखी सुधारण्याची शक्यता आहे.

औरंगाबादचे आमदार खासदार इम्तियाज जलील यांनी २ तारखेपासून मशीद खुल्या करणार असे विधान केले होते. 

त्यावर मंदिरे, मशिदी उघडा अशी मागणी करण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे असे सांगत आज तारीख काय आहे, थोडा धीर धरा अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे बारामतीमध्ये आंदोलन करीत आहेत, त्याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, राजू शेट्टी बारामतीत आंदोलन करतात हाच आमच्या सरकारमधील आणि आधीच्या सरकार मधील फरक आहे. 

आधीच्या सरकारमध्ये दपडपशाही होती. राजू शेट्टी हे आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते आहेत. कुणालाही आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंतिम वर्षाच्या परिक्षा बाबत त्या म्हणाल्या की, अंतिम वर्ष परिक्षेबाबत मी सरकार बरोबर असून जी सरकारची भूमिका तीच माझी भूमिका आहे. तसेच आता हा विषय न्यायप्रविष्ट असून फक्त तारीख आणखी पुढे ढकलायला नको, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सुप्रिया सुळे यांच्या नागरिकत्ववर सुब्रमण्यम स्वामींना यांनी ट्विट केले. त्यावर त्या म्हणाल्या की, सिंगापूर नागरिकत्वविषयीची केस मी न्यायालयात जिंकले असून त्यामुळे ट्विट करणाऱ्या सुब्रमण्यम स्वामींनाच या बाबत विचारा, असे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post