संतापजनक... चार वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून अत्याचारवेब टीम : मुंबई

मुंबईतील फुटपाथवर आईच्या कुशीत झोपलेल्या एका चार वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. 


या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली असून त्याच्याकडून मुलीचे कपडे जप्त करण्यात आले आहेत.


पीडित मुलगी तिच्या आई सोबत मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील पूलाच्या खाली राहते. 


सोमवारी रात्री ती आईसोबत झोपलेली असताना त्या नराधमाने तिचे अपहरण केले. 


त्यानंतर तो तिला घेऊन एका अज्ञात स्थळी गेला व तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. 


त्यानंतर मुलीला तिथेच जखमी अवस्थेत सोडून तो पळून गेला. पहाटे एका व्यक्तीला त्या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. 


त्याने पाहिले तर मुलगी जखमी अवस्थेत झुडपात पडलेली होती. त्याने तत्काळ पोलिसांना कळवले असता. 


पोलिसांनी मुलीला जेजे रुग्णालयात दाखल करून तत्काळ परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासले. 


तेव्हा त्यांना तो नराधम मुलीला घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post