lal_krishna_adwani-ram-mandir
वेब टीम : दिल्ली
नियतीने माझ्याकडून रथयात्रा घडवली हे माझं भाग्य समजतो.
प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपूजन हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे, या शब्दात भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत आनंद व्यक्त केला.
अयोध्येत ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपूजन होणार आहे.
“राम मंदिर उभे राहिल्याने आपल्या देशाची प्रतिमा जगात उंचावेल, एक बलशाली देश,
भरभराट करणारा शांतीप्रिय देश अशी आपली नवी ओळख निर्माण होईल असा विश्वास वाटतो” असे आडवाणी म्हणालेत.
प्रभू रामाच्या भव्य मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त अयोध्येत दिवाळी साजरी केली जाते आहे.
या मंदिराच्या निर्माण आंदोलनात १९९० मध्ये आडवाणी यांनी रथयात्रा काढली तेव्हापासून या क्षणाची सगळेजण वाट बघत होते.
९ नोव्हेंबर २०१९ ला ऐतिहासिक निकाल देत अयोध्येतली जागा हिंदूंचीच आहे त्या ठिकाणी मंदिर उभे रहावे असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.
त्यासाठी एका ट्रस्टची स्थापना करण्याची सूचना केली. कोरोनामुळे या मंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार आहे.
या पार्श्वभूमीवर आपण कृतकृत्य झाल्याची भावना आणि भरुन पावल्याची भावना लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केली आहे.
लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी हे ज्येष्ठ नेते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.