राज्य सांभाळता येत नाही आणि देशाचे नेतृत्व काय करणार; राणेंचा ठाकरेंवर 'प्रहार'वेब टीम : मुंबई

राज्य सांभाळता येत नाही आणि देशाचे नेतृत्व काय करणार, अशा शब्दांत भाजप खासदार नारायण राणे यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.


खासदार संजय राऊत यांनी ठाकरे यांच्यात राष्ट्रीय नेतृत्वाची क्षमता असल्याचे म्हटले होते. 


त्यावरून राणे यांनी ट्विटरवरून ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 


उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत केंद्राला घाबरायचे की विरोधात लढायचे ते ठरवा असे सांगितले होते. 


राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राने राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवावी, असे म्हटले होते.


उद्धव ठाकरे स्पष्ट वक्ते आहेत. त्यांच्यामध्ये केंद्राविरोधात लढण्याची क्षमता आहे. 


त्यामुळेच त्यांनी बिगरभाजप राज्यांना आवाहन केले होते. 


त्यामुळे या राज्यांचे नेतृत्व उद्धव यांनी करावे, असे राऊत म्हणाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post