satayjeet-tambe-aditay-thackray
वेब टीम : मुंबई
आदित्यजी, चिंता करु नका…. जनता हुशार आहे, मुंबई पोलिस सक्षम आहे की बिहार पोलिस ? हे शेमडं पोरगं पण सांगू शकेल…
आपण करीत असलेले उत्तम कार्य सहन न होऊ शकणाऱ्यांचे हे गलिच्छ राजकारण आहे,
या शब्दात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना पाठिंबा घोषित केला आहे.
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ठाकरे घराण्यावर विरोधक आरोप करत आहेत.
यावर आदित्य ठाकरे यांनी उग्विग्न होत आपली बाजू मांडली आहे.
त्यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना पाठिंबा घोषित केला.
या प्रकरणी आपण चिंता करू नये, आपण करीत असलेले उत्तम कार्य सहन न होऊ शकणाऱ्यांचे हे गलिच्छ राजकारण आहे, असे तांबे म्हणाले.
दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे.
ही वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी आहे.
मृताच्या टाळूवरचे लोळी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.