महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करणाऱ्या डीजीपी पांडेचा राजकारणात प्रवेश...वेब टीम : पाटणा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारचे माजी माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी आता राजकीय इनिंग सुरू केली आहे. 


बिहार निवडणुकीपूर्वी बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी जनता दल युनायटेडमध्ये (जेडीयू) प्रवेश केला आहे. 


बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत गुप्तेश्वर पांडे यांनी जेडीयूचे सदस्यत्व घेतले. 


बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. 


गुप्तेश्वर पांडे आता जेडीयूमध्ये दाखल झाले आहेत. रविवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांना पक्षाचं सदस्यत्व दिले. 


गुप्तेश्वर पांडे यांनी शुक्रवारीच एनडीएसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.


मुख्यमंत्र्यांनी मला बोलावलं आणि पक्षात प्रवेश करण्याचं आवाहन केलं. पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण करेन. 


मला राजकारण समजत नाही. मी एक सामान्य व्यक्ती आहे. आपला वेळ समाजातील उपेक्षित वर्गासाठी काम केलं आहे, 


असं गुप्तेश्वर पांडे यांनी जेडीयूत प्रवेश केल्यावर सांगितलं.


बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीशकुमार यांनी आज दुपारी चार वाजता पक्षाचं सदस्यत्व दिलं. 


पोलिसांच्या कामात त्यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. त्यांच्या या कार्यपद्धतीने मी सुरुवातीपासूनच प्रभावित होतो. 


निवडणुका लढवायची की नाही, हा माझा विषय नाही, असं पांडे म्हणाले.


वास्तविक, माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर (VRS) राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. 


सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्याने गुप्तेश्वर पांडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. 


माजी डीजीपी असलेल्या पांडे यांनी या प्रकरणी नितीशकुमार यांच्या सुशासनाचे कौतुक केले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post