बिडी, सिगारेटच्या विक्रीवर निर्बंध... 'या' प्रकारे खरेदी करता येणार ..वेब टीम : मुंबई

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सुटी सिगारेट व बिडी विकण्यास मनाई केली आहे. 


सिगारेट व बिडीच्या बंद पाकीटावर धौक्याचा सूचना असते. मात्र सुटी सिगारेट व बिडीवर तसा कोणताही इशारा नसतो. 


पूर्ण पाकिट विकत मिळू शकते परंतु, आता एक किंवा दोन अशी सुटी सिगारेट अथवा बिडी मिळणार नाही. 


याआधी राज्य सरकारने शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर बंदी घातलेली आहे. 


आता करोना काळात सरकारने आणखी एक पाउल टाकत सुटी सिगारेट, बीडी विकण्यावर बंदी घातली आहे. 


याबाबत स्थानिक प्रशासन, पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post