जिथं विरोधकांना पोहोचता आलं नाही तिथं मी पोहोचलो...वेब टीम : मुंबई

राज्यात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. 


मोठ्या कालावधीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. 


यावेळी त्यांनी कोरोनाच्या मुद्द्यावर भाष्य केले असले तरी, विरोधकांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले.


राज्यात एवढे मोठे संकट ओढावले असले तरी मुख्यमंत्री मात्र घरातच बसून काम करत आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. 


मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही ज्या ठिकाणी पोहचू शकले नाहीत त्या ठिकाणी मी पोहचू शकलो. 


व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यभरातील प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. 


कृपया कोरोनाच्या संकटकाळात राजकारण करू नका, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post