लडाखमध्ये तणाव वाढला... चीनने सुरु केली सैन्याची जमवाजमव...वेब टीम : दिल्ली

पूर्व लडाखमधील सीमेवर तणाव आणखी वाढला आहे. 


भारत आणि चीनचे जवान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही पावलांवर आमने-सामने आले आहेत. 


उभय नेत्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये मॉस्कोच्या बैठकीत पाच मुद्द्यांवर एकमत होऊनही चीनने सैन्यांची जमावजमव सुरूच ठेवली आहे.


चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पूर्व लडाखमध्ये पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या स्पांगुर गॅप येथे हजारो जवान, रणगाडे आणि तोफा तैनात केल्या आहेत. 


सोबतच, चीनने मिलिशिया दस्तेही तैनात केले आहेत. भारतानेही सामरिक दृष्टीने महत्त्वाच्या दर्‍याखोर्‍यांत आपले जवान तैनात केले आहेत. 


शिवाय, भारतीय लष्कराचे जवानही चीनच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. 


कोणत्याही स्थितीचा सामना करण्यास तयार असल्याचे नुकतेच तिन्ही दलांचे प्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले होते.


दरम्यान, अमेरिकेतील संसदेच्या खासदारांनी भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावावर चिंता व्यक्त केली आहे. 


भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार अ‍ॅमी बेरा यांनी दोन्ही देशांनी चर्चेद्वारे वादग्रस्त क्षेत्रांमधून सैन्य माघार घ्यायला हवी. 


चीनने आपल्या शेजारी राष्ट्रांसोबतचा वाद शांततेच्या मार्गाने सोडवायला हवा, असे म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post