उदयनराजे कडाडले... म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारचवेब टीम : मुंबई

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यातील वातावरण चांगलचं पेटलं आहे. 


सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली असताना आता छत्रपती उदयनराजेंनीही यात उडी घेतली आहे. 


मी कधी राजकारण करत नाही. 


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच, असं विधान भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी केलं. 


एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं. 


मराठा आरक्षणाबाबत एक ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी इच्छा त्यांनी केली.


इतर समाजाविषयी मला आदर आहे. मात्र प्रत्येक समाजाला त्यांचा हक्क मिळायला हवा ही माझी आधीपासूनची भूमिका आहे. 


न्यायालयानेही सर्व लोकांना समान अधिकार द्यावेत न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणं स्वाभाविक आहे. 


मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार, हे मी मनापासून सांगतोय. 


फक्त मराठा समाजासाठीच नाही इतर कोणावर अन्याय होत असतील तर त्यांच्यासाठीही लढणार. 


कोणावर अन्याय झाला आणि वेळ आली तर राजीनामा देणार.


काय होत नसेल तर पदावर राहून काय उपयोग? असं उदयनराजे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post