एनसीबीची चौकशी सुरु झाली अन् दीपिकाला रडू कोसळले...

file photo


वेब टीम : मुंबई

एनसीबीच्या विशेष पथकाने कुलाबा येथील विश्राम गृहावर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्याकडे चौकशी केली. 


दोघींना समोरासमोर आणून अंमलीपदार्थांचे सेवन, पुरवठा आदीबाबत प्रश्न विचारण्यात आले. 


‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, या चौकशीदरम्यान दीपिकाला रडू अनावर झालं. 


एनसीबीच्या मुंबई विभागाकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी अंमलीपदार्थांचा संबंध आहे का, याबाबत तपास सुरू आहे.


या चौकशीदरम्यान दीपिकाने ड्रग्सचं सेवन केल्याचं नाकारलं. त्याचसोबत व्हॉट्स अॅप चॅट खरे असल्याची कबुली दिली. 


एनसीबीने दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन्स जप्त केले आहेत. 


या चार अभिनेत्रींसोबतच दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, सिमोन खंबाटा आणि जया साहा यांचेसुद्धा फोन्स जप्त करण्यात आले आहेत.


बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींशी जुळलेल्या ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश या तरुणीच्या चौकशीनंतर एनसीबीने दीपिकाला समन्स बजावले. 


तीन वर्षांपूर्वी करिश्माने एका व्यक्तीसोबत साधलेला संवाद एनसीबीच्या हाती लागला. 


त्यात करिश्मा ‘डी’ असे नाव सेव्ह केलेल्या व्यक्तीसोबत चरसबाबत चर्चा करत होती. 


ही डी नावाची व्यक्ती दीपिका असावी असा संशय एनसीबीला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post