Kill Narendra Modi... इमेल मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्कवेब टीम : दिल्ली
राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा ई-मेल मिळाला असून ज्यात देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालेल्या या ईमेलमध्ये केवळ Kill Narendra Modi या ३ शब्दांचा उल्लेख करण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ माजली आहे.

मिडिया रिपोर्टनुसार राष्ट्रीय तपास यंत्रणेने याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती दिली आहे. 

ज्यानंतर गृहमंत्रालयाने तात्काळ एसपीजीला सतर्क केले आहे. एसपीजीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. 

सध्या एनआयएकडून ईमेलमधील कन्टेंन्टची तपासणी सुरु आहे. याबाबत गृहमंत्रालयाला पत्र लिहून माहिती देण्यात आली आहे. 

या पत्रात एनआयएला एक ईमेल प्राप्त झाला असून त्यात काही लोकांच्या हत्येची धमकी देण्यात आली आहे. 

यातील मजकूर आणि ईमेल कॉपी गृहमंत्रालयाला पाठवलेल्या पत्रासोबत जोडली आहे. 

हा ई-मेल समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रॉ, गुप्तचर यंत्रणा, संरक्षण गुप्तचर यंत्रणा एनआयएच्या संपर्कात आहे. सध्या या ई-मेलमधील मजकुराचा तपास सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post