टिकटॉकचे दिवस भरले... भारत, अमेरिकेनंतर पाकिस्तानातही बंदी...वेब टीम : कराची

भारत-चीन तणावानंतर भारताने आक्रमक होत अनेक निर्णय घेतले. त्यातच तंत्राद्यानासंबंधीत अनेक निर्णय होते. 


चीनी असणारे शेकडो अॅप भारत सरकारने बॅन केले होते. टिकटाॅकसारखे अनेक लोकप्रिय असलेले अॅप एका झटक्यात बंद करण्यात आले. 


भारतानंतर आता पाकिस्ताननेही चीनला मोठा झटका दिला आहे. 


पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे पाकिस्तानमध्ये टिकटाॅकवर बंदी घालण्यात आली आहे.


टिकटाॅवर बंदी घालण्यापूर्वी पाकिस्तानने टिकटाॅक अनेक पूर्वसूचना दिल्या होत्या. 


मात्र टिकटाॅकने त्या सूचनांना गांभीर्याने ने घेतल्याने पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलले आहे.

 

बंदी घालण्याचे प्रमुख कारण म्हणजे अश्लील व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येते. पाकिस्तान सरकारने स्पष्ट केले की, ही बंदी तात्पुरती स्वरूपाची असणार आहे. 


जर टिकटाॅकने अॅपवरील अश्लील व्हिडीओसंदर्भात कार्यवाही कशी करण्यात येणार आहे, त्याचे धोरण कसे असणार आहे, याबाबत माहिती दिल्यास ही बंदी उठवण्यात येणार आहे.


पाकिस्तानच्या माहिती मंत्री शिबली फराज यांनी सांगितले की, टिकटाॅकसारख्या अॅप्सवरून अश्लील व्हिडीओ प्रसारीत झाल्यामुळे समाजात अश्लीलता वाढते. 


त्यामुळे गुन्हे वाढतात आणि कुटुंब व्यवस्थेवर दुष्परिणाम होतो, असे पंतप्रधान इम्रान खान यांचे म्हणणे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post