पारनेर शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी दीपाली औटी.. पारनेर प्रतिनिधी : अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्य...
पारनेर शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी दीपाली औटी..
पारनेर प्रतिनिधी :
अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात युवतींचे मोठे संघटन उभे असून युवती पुढे येऊन सामाजिक कामे करत आहेत. पारनेर येथील दिपाली औटी पारनेरचे आमदार निलेश लंके व जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांच्या माध्यमातून चांगले काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी त्यांचे सुरू असलेले काम निश्चितच चांगले असून त्यांच्या कामाची दखल घेत. त्यांची राष्ट्रवादी युवतीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांनी पारनेर शहर अध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती केली. त्यांना नियुक्तीचे पत्र पारनेरचे आमदार लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी सुपा ग्रामपंचायत सदस्या व राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या नेत्या सुरेखाताई पवार या उपस्थित होत्या तसेच यावेळी राजेश्वरीताई कोठावळे यांचे युवती सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आमदार निलेश लंके यांनी पारनेर शहराध्यक्षपदी दिपाली औटी यांची निवड झाली म्हणून त्यांचा यावेळी सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
COMMENTS