आरोग्य शिबीरांचा जनतेने लाभ घ्यावा : विकास रोहोकले ------- आरोग्य व नेत्र तपासणी शिबीरात २७८ रुग्णांची तपासणी अळकुटी/प्रतिनिधी : पारनेर...
आरोग्य शिबीरांचा जनतेने लाभ घ्यावा : विकास रोहोकले
-------
आरोग्य व नेत्र तपासणी शिबीरात २७८ रुग्णांची तपासणी
अळकुटी/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यात हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेने विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुका शिवसेनेने आयोजित केलेल्या आरोग्य व नेत्र तपासणी शिबीरांचा जनतेने लाभ घ्यावा असे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी केले.
अळकुटी येथे शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई- ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आरोग्य चिकित्सा, नेत्र तपासणी तसेच चष्मा व औषध वाटप शिबीराचा उदघाटन समारंभ शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष येवले, विभाग प्रमुख सखाराम उजगरे सर, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. भास्कर शिरोळे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सरपंच डॉ. कोमल भंडारी, उपसरपंच शरद घोलप, मा. सरपंच बाळकृष्ण परडवाल, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब धोत्रे, अरिफ पटेल, सारिका शिरोळे, किरण शिंदे, मिराबाई शिरोळे, श्रीमती लता घोलप, मयुर पगारिया, कॉन्ट्रॅक्टर संजयदादा ठुबे, भगवान शिंदे, संजय मते खंडूशेठ मस्के, अशोक शिरोळे, नितीन परंडवाल, सुभाष औटी, सुभाष भोसले, बाळासाहेब ठुबे, जालिंदर घोलप, विशाल घोलप, प्रदीप घोलप, गणेश घोलप, सागर घोलप, स्वप्निल घोलप अनिल पुंडे, संदीप घोलप, बाळासाहेब शिरोळे, अरुण परंडवाल, बाबासाहेब परंडवाल, दत्ता परंडवाल, संपत जाधव, बाजीराव शिरोळे, सुनील वाघुले, विकास भंडारी किरण दरेकर, रामदास येवले, प्रणव गाडगे, अजित क्षिरसागर, भरतरी काणे, विठ्ठल माने, राजेश येवले, अनिल भोर, नितीन परंडवाल व ग्रामस्थ उपस्थित होते.
या शिबीरात २७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. लोककल्याण आरोग्य केंद्राचे डॉ. मयुर काळे, जफर शेख, सदानंद मोरे, भगवंतराव पाटील यांचे शिबीरास योगदान लाभले .
COMMENTS