रिपाइंचे राजेंद्र उबाळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा ----------- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात ...
रिपाइंचे राजेंद्र उबाळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा
-----------
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात सामाजिक उपक्रम
------------
वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत दिला संदेश
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे यांचा वाढदिवस संपूर्ण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत कोरोनाच्या नियमांचे पालन करत साजरा करण्यात आला.
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे राजेंद्र उबाळे मित्र परिवाराच्या वतीने ह. भ. प. विलास महाराज लोंढे यांच्या आनंद सिंधू वृद्धाश्रमात आई-बाबांच्या सेवेसाठी किराणा किट घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली. वाढदिवसानिमित्त राजेंद्र उबाळे यांनी हे सामाजिक दायित्व दाखविले हे खरंच कौतुकास्पदच आहे.
सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी वाढदिवस साजरा केला त्यामुळे आजच्या युवकांमध्ये एक आदर्श निर्माण झाला आहे. केक संस्कृती राहा ना करत सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पारनेर तालुका अध्यक्ष राजेंद्र उबाळे हे नक्कीच चांगले सकारात्मक काम करत आहेत.
दरम्यान राजेंद्र उबाळे यांनी वाढदिवसानिमित्त टाकळीढोकेश्वर येथे वृक्षारोपणही केले. यावेळी टाकळीढोकेश्वर कर्जुले हरेश्वर वासुंदे व खडकवाडी पळशी वडगाव सावताळ ढवळपुरी भाळवणी या ठिकाणचे अनेक कार्यकर्ते व राजेंद्र उबाळे यांचे मित्र उपस्थित होते.
दरम्यान कुरुंद या ठिकाणी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी रिपाइं पारनेर तालुका उपाध्यक्ष राजेश साठे, तालुका उपाध्यक्ष किरण खुपटे, तालुका संघटक गोरख सुर्यवंशी तालुका संघटक शरद सोनवणे, ओम गायकवाड आदी व राजेंद्र उबाळे यांचे मित्र तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
COMMENTS