अहमदनगर (प्रतिनिधी)- मॉडलिंग क्षेत्रातील एनएफएमए आयोजित मिस्टर अॅण्ड मिस इंडिया इंटरनॅशनल स्टार 2021 साठी उपांत्य फेरी शहरातील राष्ट्रवा...
अहमदनगर (प्रतिनिधी)-
मॉडलिंग क्षेत्रातील एनएफएमए आयोजित मिस्टर अॅण्ड मिस इंडिया इंटरनॅशनल स्टार 2021 साठी उपांत्य फेरी शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये मोठ्या दिमाखात पार पडली. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरातमधून 130 पेक्षा जास्त मॉडेल्स सहभागी झाले होते. शहरातील आयकॉनिक मॉडेलिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नवोदित मॉडेल्सन प्रोत्साहन देण्यासाठी व परीक्षणासाठी बिग बॉस, नच बलिये, स्प्लेट विला, एमटीव्ही रोडीज विनर प्रिन्स नुरुला हजर होते. प्रिन्स नुरुला यांन यांना पाहण्यासाठी युवक-युवतींनी मोठी गर्दी केली होती.
शहरात कोरोनानंतर दोन वर्षांनी मोठ्या सेलिब्रिटीच्या उपस्थितीमध्ये हा फॅशन शोचा सोहळा पार पडला. यामध्ये विजेते झालेले मॉडेल प्रज्वल भिंगारदिवे, प्रेम गोलांडे, स्वप्निल काळे, उजेर शेख, प्रसन्ना बनकर, वृषाली वारकड, धनश्री वाघ, अनन्या इथापे, सोना बगारे यांची डिसेंबर मध्ये लखनऊ येथे होणार्या मिस्टर अॅण्ड मिस इंडिया इंटरनॅशनल स्टार 2021 च्या फायनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर मॉडेल महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती एनएफएमएचे संचालक गौरव राना, आयकॉनिक मॉडलिंग इन्स्टिट्यूटचे फॅशन डिझायनर स्वप्नील भोसले यांनी दिली. ही मॉडलिंग शो ची स्पर्धा पार पडण्यासाठी ड्युड फॅशनचे साहिल बागवान, संकेत शिंदे, मेकअप आर्टिस्ट स्मिता बकरे, सोन्या रणदिवे, श्रीकांत कोडम यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, ओबीसी सेलचे अमित खामकर यांचे सहकार्य लाभले.