--> अहमदनगर पुन्हा हादरले... डॉक्टरने केला सख्ख्या भावावर गोळीबार | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

अहमदनगर पुन्हा हादरले... डॉक्टरने केला सख्ख्या भावावर गोळीबार

  अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे एका डॉक्टरने सख्ख्या भावावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम...

 


अहमदनगर :

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे एका डॉक्टरने सख्ख्या भावावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले पथकासह घटनास्थळी हजर झाले. 


डॉ. विजय देवीचंद मुनोत आणि मनोज देविचंद मुनोत या दोन भावांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हा गोळीबार झाला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ढिकले यांनी दिली आहे. डॉ. विजय मुनोत यांनी मनोज मुनोत यांच्यावर रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या झाडल्या असून एक गोळी मांडीला तर दुसरी गोळी पोटाला लागली आहे. मनोज मुनोत यांना उपचारासाठी दौंड येथील पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती खालावल्याने पुणे येथे उपचारासाठी पाठवावे असे पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. 


काष्टी येथे विजय मुनोत यांचा वैद्यकिय व्यावसाय आहे तर मनोज मुनोत यांचा किराणा विक्रीचा व्यावसाय आहे. डॉ. विजय मुनोत यांचे हॉस्पीटल असून त्याच्याच समोर मनोज मुनोत यांचा किराणा विक्रीचा व्यावसाय आहे. बुधवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान मनोज मुनोत यांच्या दुकानात विक्रीचे साहित्य घेऊन एक टेम्पो आला होता. टेम्पो चालकाने सदर टेम्पो डॉ. मुनोत यांच्या हॉस्पीटलसमोर उभा केला होता. टेम्पो माझ्या दवाखान्यासमोर का उभा केला असले म्हणून डॉ. विजय मुनोत यांनी मनोज मुनोत यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर दोन्ही भावांमध्ये झटापट झाली. याचवेळी मनोज मुनोत यांनी डॉ. विजय मुनोत यांच्या डोक्याला मारहाण केल्याने ते जखमी झाले तसेच डॉ. विजय मुनोत यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने मनोज मुनोत यांच्यावर गोळीबार केला. डॉ. विजय मुनोत यांनी रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या मनोज मुनोत यांच्यावर झाडल्या असून एक गोळी मांडीला तर दुसरी गोळी पोटाला लागली आहे. 


पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी हजर झाले. जखमी डॉ. विजय मुनोत यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले आहे तर मनोज मुनोत यांची प्रकृती खालावत चालल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. ज्या रिव्हॉल्वरमधुन गोळीबार करण्यात आले ते जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4281,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2655,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: अहमदनगर पुन्हा हादरले... डॉक्टरने केला सख्ख्या भावावर गोळीबार
अहमदनगर पुन्हा हादरले... डॉक्टरने केला सख्ख्या भावावर गोळीबार
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhX3UcyQxGb-W6Tt3Dd2244yu1OAp2LrYq5uPKKEMNItI374OAhiUElztA4AD3BMAEZaK2esl_nq-lSeBUVVuv6j_IHE1PFqyKZSHepcjpxRrOfhTAJjNeJRwNgBAnzzOUWFRUbpmHnFxMIXQ__puYO_Nn4t08DuyY1UtoJNsZmzFXF0UjX77bg2bNA=w640-h358
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhX3UcyQxGb-W6Tt3Dd2244yu1OAp2LrYq5uPKKEMNItI374OAhiUElztA4AD3BMAEZaK2esl_nq-lSeBUVVuv6j_IHE1PFqyKZSHepcjpxRrOfhTAJjNeJRwNgBAnzzOUWFRUbpmHnFxMIXQ__puYO_Nn4t08DuyY1UtoJNsZmzFXF0UjX77bg2bNA=s72-w640-c-h358
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2021/11/Crime.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2021/11/Crime.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content