वेब टीम : अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे धक्कादायक घटना घडली आहे. भाजपच्या माजी आमदाराने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत असल्याचा निषे...
वेब टीम : अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे धक्कादायक घटना घडली आहे. भाजपच्या माजी आमदाराने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत असल्याचा निषेध करत महावितरण कार्यालयातच गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
महावितरणच्या वतीने शेती पंपाची वीज तोडण्याची मोहीम सुरू असून याबाबत भाजपने नेवासा येथील तालुका कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. मागणी मान्य केली जात नसल्याने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वीज वितरण कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नेवासा भाजपचे पदाधिकारी (BJP) वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. शेतकऱ्याकडून पाच हजार रुपये न घेता तीन हजार रुपये भरून घ्यावेत ही मागणी केली होती. मात्र ती मान्य न केल्याने मुरकुटे यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. भाजप पदाधिकारी यांनी त्यांना सोडवले.