संदीप पाटील वराळ गोरगरीबांची दिवाळी उपक्रमाचा १२०० कुटुंबांना लाभ. निघोज येथे गोरगरीब कुटुंबांची दिवाळी झाली गोड सचिन पाटील वराळ यांनी राबवि...
संदीप पाटील वराळ गोरगरीबांची दिवाळी उपक्रमाचा १२०० कुटुंबांना लाभ.
निघोज येथे गोरगरीब कुटुंबांची दिवाळी झाली गोड
सचिन पाटील वराळ यांनी राबविलेला उपक्रम
पारनेर प्रतिनिधी :
गेली सहा दिवसांत संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ संचलित संदीप पाटील गोरगरीबांची दिवाळी या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून निघोज व परिसरातील हजार ते बाराशे कुटुंबांना साडी,मिठाईचे वाटप करण्यात आले तसेच सहाशे पेक्षा जास्त ज्येष्ठ ग्रामस्थांना शाल श्रीफळ व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.
लक्ष्मीपूजनच्या शुभमुहूर्तावर या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरीमधील सभागृहात या प्रथम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराममामा लंके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला . संदीप पाटील गोरगरीबांची दिवाळी या सामाजिक उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ लोकसहभागातून दरवर्षी हा उपक्रम संपन्न होत असतो. यामध्ये कन्हैया दूध उद्योग समूहाकडून श्रीखंड देण्यात येतो.कन्हैयाचे या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून होणाऱ्या लोकसहभागागामध्ये सर्वाधिक योगदान आहे.
त्यानंतर संत सेना नाभिक सामाजिक सभागृह, वडगाव गुंड येथील भैरवनाथ मंदिर,शिरसुले येथील खंडोबा मंदिर, वरदविनायक मंदिर सभागृह लाळगे व तनपुरे वस्ती, गावातील गोरोबा काका सभागृह, वरखडे वस्ती येथील दत्त मंदिर सभागृह , सोनवणे कॅंप वस्ती,ढवणवाडी येथील चौक, कुंड परिसरातील ठाकर वस्ती अशा प्रत्येक ठिकाणी हे वाटप करण्यात आले. यानंतर शाळा सुरू झाल्यावर गाव व परिसरातील अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य सेविका यांचाही अशाप्रकारे सन्मान करण्यात येणार आहे.गेली सात वर्षांपूर्वी माजी सरपंच व बाजार समितीचे उपसभापती संदीप पाटील वराळ यांनी गोरगरीबांची दिवाळी हा उपक्रम सुरू केला होता.
आजतागायत हा उपक्रम संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू ठेवला असून तो शेवटपर्यंत सुरू राहणार असल्याची ग्वाही सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. पहिल्या वर्षी दोनशे कुटुंबापर्यत या उपक्रमाचा फायदा झाला गेली सहा वर्षात प्रत्तेक वर्षी दोनशेने वाढ होत असून यावर्षी बाराशे पेक्षा जास्त कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे. ग्रामपंचायत माजी सदस्य व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे मुख्य पदाधिकारी मंगेश लाळगे यावेळी म्हणाले की या भागातील गोरगरीबांचे दैवत संदीप पाटील वराळ यांनी विविध सामाजिक उपक्रम सुरू करीत लोकविकासाचे काम केले.त्यांचे कार्य असेच सुरू ठेवण्यासाठी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी यथोचित प्रयत्न केले.
गेली चार वर्षांत पंचायत समिती,जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या माध्यमातून निघोज व आळकुटी जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली.सामाजीक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवेचे काम झाले.सचिन पाटील यांचे आजोबा किसनराव वराळ पाटील यांनी सोसायटी व ग्रामपंचायत मध्ये सरपंच चेअरमन म्हणून पन्नास वर्षे बिनविरोध काम करताना सामाजिक कामांचा वारसा निर्माण केला तोच पुढे वराळ कुटुंबातील सर्वच पिढ्यांनी सुरू ठेवला. समाजातील गोरगरीब गरजू घटकांना आधार देण्याचे खरे काम सध्या सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
ते कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार लाळगे यांनी व्यक्त केले आहे. या सर्व ठिकाणच्या कार्यक्रमात संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, जिल्हा परिषद अधिकारी संतोष लंके साहेब, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माउलीशेठ वरखडे, ग्रामपंचायत सदस्या, भावना साळवे, शबनुर इनामदार,मिराबाई घोगरे, रुपाली गायखे, जयाताई वराळ, ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ, फौंडेशनचे मार्गदर्शक बजरंग वराळ,
पारनेर तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक दत्ता उनवणे, शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष ईधाटे, सुनिल दादा पवार, मंगेश दादा लाळगे, भिमराव लामखडे, ठेकेदार बाबाजी लंके, सामाजिक कार्यकर्ते अनिल लंके, सुनिल लंके, बाबाजी वाघमारे, मोहन साळवे, सतिष साळवे,
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सचिव ठकाराम गायखे, राहुल वराळ, मुंबई महापालिका अधिकारी संदेश लंके, विलासराव हारदे, युवानेते गणेश लंके, अर्जुन लामखडे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, मनोहर राउत, निलेश घोडे, पैलवान सुभाष वराळ, दत्तात्रय लंके साहेब,साजिदभाई तांबोळी, निलेश खोबरे, विलासराव वराळ, मेजर विकास वराळ, रमीज शेख, विशाल जगदाळे,किसन घोगरे, दत्तात्रय घोगरे, रवि लाळगे,आप्पा वराळ,रामा वराळ, स्वप्नील आतकर, नविन गायकवाड, दिनेश ठुबे, प्रशांत पिंपरकर,अल्फेज इनामदार, दत्ता लंके, दिनेश ठुबे,सुनिल वराळ पाटील, आयुष वराळ पाटील,अथर्व वराळ पाटील,सुजय वराळ पाटील,आकाश वराळ, अनिकेत लंके, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन संपर्क कार्यालय व्यवस्थापक श्रीकांत पवार साहेब आदी तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, व संदीप पाटील वराळ युवामंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली सहा दिवसांत बाराशे पेक्षा जास्त कुटुंबांना या दिवाळीचा आनंद या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून झाला हे आम्हाला मिळालेले मोठे समाधान व आनंद असल्याची प्रतिक्रिया संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी बोलताना व्यक्त केले आहे.यासाठी लोकसहभागातून मोठी मदत झाली असून त्यांचेही वराळ यांनी आभार मानले आहेत.