कान्हूर पठार येथील सेंट्रल बँकेत सर्वसामान्य व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या अडचणीसंदर्भात निवेदन जितेश सरडे यांनी बँक अधिकाऱ्यांची घेतली भेट...
कान्हूर पठार येथील सेंट्रल बँकेत सर्वसामान्य व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या अडचणीसंदर्भात निवेदन
जितेश सरडे यांनी बँक अधिकाऱ्यांची घेतली भेट
पारनेर/प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जितेश सरडे यांनी कान्हर पठार येथे अपुऱ्या कर्मचाऱ्यांनमुळे आर्थिक व्यवहारास होतं असलेली दिरंगाई, शेतकरी व विद्यार्थी बांधवांचे रखडलेले कर्ज प्रकरणे, एटीएम सेवा सुरूळीत करणे व मुख्यतः कान्हुर पठार येथील सेंट्रल बँकची शाखा ही इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिकांना येण्या-जाण्यासाठी त्रास होतोय.
लवकरात लवकर पहिल्या मजल्यावर असणारी शाखा तळमजल्यावर घ्यावी यासंदर्भात निवेदन दिले. निवेदनातील सर्व मागण्या मान्य न झाल्यास १ डिसेंबरला बॅंकेस टाळे ठोकण्याचा इशारा जितेश सरडे यांनी बॅंक व्यवस्थापन अधिकाऱ्यांना भेटून दिला.
यावेळी समवेत सहकारी चंद्रभान ठुबे, किरण ठुबे, प्रसाद नवले, संजय सोनावळे, श्रीकांत ठुबे, बंडूशेट सोनावळे, स्वप्नील ठुबे, गणेश मोरे, अक्षय लंके, मंगेश शिंगोटे हे उपस्थित होते.