पिंपरी जलसेनमध्ये भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ पोलिसांचा वचक नसल्याने दहशत नाहीच; भुरट्या चोरांना पाठबळ कोणाचे पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्...
पिंपरी जलसेनमध्ये भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ
पोलिसांचा वचक नसल्याने दहशत नाहीच; भुरट्या चोरांना पाठबळ कोणाचे
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेनमध्ये दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. पारनेर तालुक्यात पोलीस चोरट्यांवर प्रशासन आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरत आहे. या भुरट्या चोरांना नेमके पाठबळ कोणाचे ? असा सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे रस्त्याच्या कामासाठी आलेल्या डंपरची बॅटरी, व इतर साहित्य रविवारी रात्री अज्ञातांनी चोरून नेले. यापूर्वी देखील रस्त्याच्या कामासाठी आलेल्या रस्त्याला लावलेल्या रोड रोलरच्या बॅटरी चोरून नेल्या होत्या. तसेच गेल्या १५ दिवसांपूर्वी पिंपरी जलसेन येथून एका घरात धाडसी चोरी करुन महिलांच्या अंगावरील २ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. शेतीपंपाच्या मोटर देखील चोरीचा प्रकार नेहमीचाच झाला आहे. यापूर्वी गावातील पतसंस्था देखील फोडण्याचा प्रयत्न झाला होता.
असे एकंदरीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण पिंपरी जलसेनमध्ये वाढत आहे. पोलिसांना मात्र या चोरट्यांना जेरबंद करून आळा घालण्यात अपयश येत आहे. हे चोरटे नेमके कोणाच्या आशीर्वादाने चोन्या करतात की काय? असा सवाल देखील नागरिकांमधून विचारला जात आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच कडक पाऊले उचलून या चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
COMMENTS