जय भगवान महासंघ एसटी कामगारांच्या समर्थनात उतरणार आझाद मैदानात पाथर्डी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये रूपांत...
जय भगवान महासंघ एसटी कामगारांच्या समर्थनात उतरणार आझाद मैदानात
पाथर्डी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये रूपांतर करावे, या प्रमुख मागणीकरता राज्यातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला बेमुदत संप हा हळूहळू राज्यभर पसरून चिघळत चालला आहे.दिवाळी संपल्यानंतर एसटीतील अन्य कामगार संघटना ज्या या संपामध्ये सहभागी नव्हत्या, त्या देखील आता सहभागी होणार आहेत. अशातच जय महासंघ आता एसटी कामगाराच्या समर्थनातत मुंबई येथील आझाद मैदानात उतरणार आहेत .
असे जयभगवान महासंघाचे अध्यक्ष व काँग्रेस नेते बाळासाहेब सानप यांनी सांगितले ते पुढे म्हणाले
मी एसटी कामगारांचा कामगार माझा कामगारांना वाचवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी जय भगवान महासंघ तथा ओबीसी व्हिजे एन टी जनमोर्चा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ओ बी सी व्ही जे एन टी प्रवर्गातील ७५% कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे भविष्य वाचवण्यासाठी जय भगवान महासंघ व ओबीसी व्ही जे एन टी च्या वतीने आझाद मैदान येथे सर्व एसटी कामगारांच्या कुटुंबासमवेत सर्व सामाजिक संघटनांसोबत घेऊन आमरण उपोषणाला बसणार आहोत तरी सर्व कामगारांनी आपल्या कुटुंबासमवेत आजाद मैदान येथे उपस्थित राहावे एसटी कामगारांना महाराष्ट्र शासनात विलीन होत नाही
तोपर्यंत लढाई चालू ठेवण्यासाठी कामगारांच्या सोबत जीवाची बाजी पणाला लावणार आहोत कामगारांनी कोणत्याही राजकारणाला बळी पडू नये आमचा यामध्ये कुठलाही राजकीय स्वार्थ नसून कामगार जगवण्यासाठी आमची जीवाची तळमळ आहे हे कामगारांनी लक्षात ठेवावे.मी जय भगवान महासंघ तथा ओबीसी व्हिजे एन टी जनमोर्चाचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी आपणास जाहीर नम्र विनंती करतो मी आझाद मैदानावर जात आहे आपणही लवकर आझाद मैदानावर या....आपण उद्याच पत्रकार परिषद घेऊन येत्या दोन दिवसात तारीख जाहीर करु. असे सांगितले