पारनेर महावितरण कार्यालयाला भूमिपुत्र शेतकरी संघटना घेराव घालणार शेती पिकाची वीज सुरळीत करा महावितरण अधिकाऱ्यांना विचारणार जाब संतोष वाडेकर ...
पारनेर महावितरण कार्यालयाला भूमिपुत्र शेतकरी संघटना घेराव घालणार
शेती पिकाची वीज सुरळीत करा
महावितरण अधिकाऱ्यांना विचारणार जाब
संतोष वाडेकर यांची माहिती
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये आज विजेचा झालेला खेळखंडोबा लक्षात घेता त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यामुळे तालुक्यात अनेक संघटना आक्रमक झाल्या असून पारनेर येथील महावितरण कार्यालयाला भूमिपुत्र शेतकरी संघटना आता घेराव घालणार आहे व शेतकऱ्यांची वीज सुरळीत करून देण्याचे प्रशासनाकडे मागणी करणार असून शेतकऱ्यांचे तालुक्यात वीज कट केल्यामुळे आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत असून वीज पुरवठा सुरळीत करून देण्यात यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला सर्वस्वी महावितरण जबाबदार असेल असे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर अहमदनगर जिल्हा सचिव संतोष कोरडे पारनेर तालुका अध्यक्ष विशाल करंजुले, अहमदनगर जिल्हा युवक अध्यक्ष अमोल उगले, कर्जुले शाखाध्यक्ष प्रविण आंधळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान पारनेर तालुक्यात पाऊस चांगला झाल्यामुळे आता पाण्याचा प्रश्न सध्यातरी मिटला आहे. पाण्यावर अवलंबून असलेल्या शेती पिकांना आता पाणी देण्याची वेळ आली आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात विविध पिकांची आता लागवड करत आहे. पारनेर तालुक्यात कांदा पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते तसेच इतर पिकांची ही त्यामध्ये ऊस, गहू,भुईमूग मोठ्या प्रमाणात पेरणी व लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे ती पिके पाण्यावाचून जळत आहेत पिके ही विज तोडनी केल्यामुळे जळत असून शासकीय स्तरावर आता महावितरणने शेतकऱ्यांची विज सुरळीत करून द्यावी. अशी मागणी यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासंदर्भात आज पारनेर या ठिकाणी महावितरण कार्यालयाला भुमिपुत्र शेतकरी संघटना घेराव घालणार असून महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे.