कान्हूर पठार भागावर सुरळीत वीजपुरवठा नसल्याने शेतकरी संतप्त उद्या अधिकाऱ्यांना विचारणार जाब ! -------- शेतकरी नेते अनिल देठे यांच्या माध्यमा...
कान्हूर पठार भागावर सुरळीत वीजपुरवठा नसल्याने शेतकरी संतप्त उद्या अधिकाऱ्यांना विचारणार जाब !
--------
शेतकरी नेते अनिल देठे यांच्या माध्यमातून शिष्टमंडळ आमदार निलेश लंके यांची घेणार भेट !
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील कान्हुर पठार येथील विद्युत उपकेंद्रातंर्गत येणाऱ्या किन्ही ,करंदी , बहिरोबावाडी , तिखोल या गावांना गेली पंधरा दिवसांपासून सुरळीत व अखंडितपणे विजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार विजपुरवठा खंडित होत असल्याने कृषि पंप तसेच रोहिञ जळण्याचे प्रमाण वाढले आहे.
तसेच कमी क्षमतेने विजपुरवठा होत असल्याने विद्युत वाहक तारा तुटण्याच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे. यामुळे शेतक-यांची पिके पाण्याअभावी जळून चालली असुन, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी वरील गावातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन सोमवारी पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेशजी लंके व महावितरण कंपनीचे पारनेर येथील उपकार्यकारी अभियंता प्रशांत आडभाई यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे निश्र्चित केले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.