वेब टीम अहमदनगर येथील एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीमधील एका केमिकल टँकजवळ आज रात्री साडेदहा वाजता आग लागली. आगीमुळे एमआयडीसीसह आजूबाजूच्या रहि...
येथील एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीमधील एका केमिकल टँकजवळ आज रात्री साडेदहा वाजता आग लागली. आगीमुळे एमआयडीसीसह आजूबाजूच्या रहिवाशी परिसरामध्ये घबराट पसरली होती. कंपनी बाहेर बघ्यांची गर्दी होती. कंपनीत ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने सोडून देण्यात आले.
कंपनीतील आग विझवण्यासाठी एमआयडीसी, महापालिका, राहुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत मोठे प्रयत्न सुरू होते. आग विझविण्यासाठी खासगी टँकरद्वारे पाणी मागविण्यात आले. कंपनी परिसरातून रुग्णवाहिका वेगाने बाहेर पडत होत्या. या आगीत नेमके किती जखमी झाले, याची माहिती कंपनीच्या प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली नाही.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी कंपनीबाहेर गर्दी करत, नेमके काय झाले आहे, याची माहिती द्या, अशी मागणी केली. त्यानंतर कंपनीच्या प्रशासकीय पातळीवरून स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला. कंपनीच्या एका टॅंकर जवळ आग लागल्याचे सांगून परिस्थिती आटोक्यात आहे. कोणतीही मोठी दुर्घटना होणार नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. तरी देखील स्थानिक रहिवाशांनी केमिकल कंपनीतील आगीमुळे रात्र जागून काढली.
COMMENTS