पारनेर तालुका भूमिपुत्र शेतकरी युवक संघटनेच्या अध्यक्षपदी सुभाष परांडे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : सुभाष परांडे सुभाष परांडे ...
पारनेर तालुका भूमिपुत्र शेतकरी युवक संघटनेच्या अध्यक्षपदी सुभाष परांडे
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : सुभाष परांडे
सुभाष परांडे यांच्या माध्यमातून भूमिपुत्र शेतकरी संघटनेला मिळाला आक्रमक युवा चेहरा
पारनेर प्रतिनिधी :
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पारनेर तालुका युवक अध्यक्षपदी वडगाव दर्या येथील अपक्ष ग्रामपंचायत सदस्य सुभाष परांडे यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे रावसाहेब झांबरे यांची जिल्हा युवक उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
पारनेर या ठिकाणी झालेल्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या आढावा बैठकीमध्ये या निवडी जाहीर करण्यात आल्या यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी निवडीचे पत्र नवीन पदाधिकाऱ्यांना दिले..
दरम्यान भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सुभाष परांडे व रावसाहेब झांबरे हे काम करत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ती त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे.
नवनियुक्त युवक तालुकाध्यक्ष सुभाष परांडे म्हणाले की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर यापुढे काम करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेल कान्हूर पठार सारख्या पठार भागावर काम करत असताना आज अनेक शेतकरी अनेक प्रश्न व समस्यांनी त्रस्त असून त्या सोडविण्यासाठी मी प्रामुख्याने लक्ष देणार आहे.
नवीन पदाधिकार्यांची निवड झाली यावेळी पारनेर याठिकाणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, संघटनेचे प्रदेश सचिव किरण वाबळे, राज्य संपर्कप्रमुख अशोक आंधळे, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम देठे, जिल्हा संपर्कप्रमुख संतोष वाडेकर, जिल्हा संघटक संतोष वाबळे, तालुका अध्यक्ष विशाल करंजुले, तालुका सचिव बाळासाहेब वाळुंज, तालुका प्रवक्ते राजू रोकडे, बैलगाडा संघटनेचे बाशिराम पायमोडे, प्रशांत परांडे, अनिकेत परांडे, तसेच यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अनेक तालुक्यातून पदाधिकारी उपस्थित होते संघटनेच्या माध्यमातून आता पारनेर तालुक्यात वीज प्रश्नावर ती आक्रमक भूमिका घेण्यात येणार आहे.