प्रशासन आपल्या दारी आमदार निलेश लंकेंची नवी संकल्पना टाकळी ढोकेश्वर येथे शासकीय शिबिराचे आयोजन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते शिबिराचे उद्घा...
प्रशासन आपल्या दारी आमदार निलेश लंकेंची नवी संकल्पना
टाकळी ढोकेश्वर येथे शासकीय शिबिराचे आयोजन
आमदार निलेश लंके यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
समाजातील आदिवासी बांधवांनी घेतला शिबीराचा लाभ
लंके प्रतिष्ठान च्या माध्यमातून उपक्रम
पारनेर/प्रतिनिधी :
आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाने निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी टाकळी ढोकेश्वर गट यांच्या प्रयत्नातून सेतु कार्यालय कर्जुले हर्या व टाकळी ढोकेश्वर यांच्या मदतीने नवीन आधार कार्ड काढणे व दुरुस्ती करणे कोविड मध्ये मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबास 50 हजार सानुग्रह अनुदान ऑनलाईन करणे नवीन रेशन कार्ड काढणे व दुरुस्ती करणे जातीचे दाखले तयार करणे या शासकीय प्रमाणपत्रांचा व योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळण्यासाठी व त्यांच्या असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी निलेश लंके प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी म्हसोबा झाप चे सरपंच प्रकाश गाजरे यांच्या माध्यमातून या शासकीय शिबिराचे आयोजन टाकळी ढोकेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आले होते या शिबिरामध्ये टाकळीढोकेश्वर गटातील ग्रामस्थांनी लाभ घेतला या शिबिराचे उद्घाटन व तसेच टाकळी ढोकेश्वर येथे व्यायाम शाळेचे उद्घाटन
आमदार निलेश लंके, तहसीलदार आवळकंठे साहेब, निलेश लंके प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष सुरेश धुरपते, नगर अर्बन बँकेचे नवनिर्वाचित संचालक अशोक कटारिया, निलेश लंके प्रतिष्ठान पारनेर अध्यक्ष बापूसाहेब शिर्के, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या शासकीय शिबिरामध्ये टाकळी ढोकेश्वर गटातील आदिवासी घटकातील अनेक बांधवांनी लाभ घेतला. त्यांच्या अडचणी या वेळी प्रशासनाने समजून घेतल्या व त्या सोडविल्या.
दरम्यान उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य घटकातील व्यक्तीला पारनेर या ठिकाणी कागदपत्रांसाठी ये-जा करावी लागते परंतु हे शिबिर घेऊन व प्रशासनच आपल्या दारी ही नवी संकल्पना आम्ही ठिकाणी राबवत असून या माध्यमातून अनेक लोकांचे कागदपत्र संबंधी असलेले प्रश्न सुटणार आहेत. तसेच अनेक शासकीय योजनांचा लाभ होणार असून यापुढेही अशा पद्धतीचे शिबिरे घेऊन लोकांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी तहसीलदार आवळकंठे साहेब यांनी सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोकांना प्रशासकीय कागदपत्रे तसेच शासकीय योजना यांचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व कागदपत्रांच्या संदर्भात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही अशी ग्वाही दिली.
यावेळी बोलताना निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी म्हणाले की टाकळी ढोकेश्वर गटातील आदिवासी बांधवांना खऱ्या अर्थाने या शासकीय शिबिराचा फायदा व्हावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामाध्यमातून आमदार आपल्या दारी ही संकल्पना आम्ही आरोग्य सेवा शासकीय सेवा या माध्यमातून टाकळीढोकेश्वर गटांमध्ये गेल्या एक महिन्यापासून राबवत आहोत.
या कार्यक्रमासाठी यावेळी निलेश लंके प्रतिष्ठान उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, म्हसोबा झाप सरपंच प्रकाश गाजरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी वांडेकर साहेब, विलास गायकवाड, सचिन चौधरी, वैराळकर साहेब, सोमवंशी साहेब, ओहळ साहेब, पंकज जगदाळे, सरपंच अरुणा खिलारी, उपसरपंच सुनील चव्हाण सर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पारनेर पारनेर तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, दत्ता निवडुंगे, शरद झावरे, किरण उर्फ रामभाऊ तराळ, उदय बर्वे, नर्हे मेजर, भागूजी झावरे, संदीप ठाणगे, योगेश शिंदे, सरपंच पीयूष गाजरे, किरण ठुबे, चंदू ठुबे, संभाजी वाळुंज, विलास धुमाळ, विलास ठुबे, विक्रम झावरे, आशपाक हवलदार, अशोक पायमोडे, गंगाधर निवडुंगे, दामोदर झावरे, बंडू राधवन, मंगेश खिलारी गुरुजी, तुषार गोरडे, सोमा बांडे,
किसन धरम, श्रावण गायकवाड संदीप पायमोडे, भाऊसाहेब झावरे, प्रशांत तराळ, राजेंद्र झावरे, शांताराम झावरे, डॉ. अरुण झावरे, युवराज खिलारी, नितीन ढोकले, रवी ढोकले, संदेश झावरे, मुख्याध्यापक राजेंद्र ठुबे, सर्व तलाठी मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषी विभाग, पुरवठा अधिकारी, आधार केंद्र संचालक, महसूल विभाग राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, निलेश लंके प्रतिष्ठान पारनेर तालुका पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी व म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे टाकळीढोकेश्वर गटामध्ये आमदार आपल्या दारी हा विशेष उपक्रम सध्या राबवत असून या माध्यमातून अनेक सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू आहे.
COMMENTS